56 दिवसांत 6736 रुग्ण वाढले
दिवसेंदिवस शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. प्रतिदिन ग्रामीण भागातही शंभरहुन अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. 1 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर पर्यत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या अहवालानुसार तब्बल 6736 कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. तसेच 1 सप्टेंबर पासून ते आजपर्यत या 25 दिवसांत कोरोनाबाधितांचा अहवाल पाहिला तर ग्रामीण भागात 2991 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हे प्रतिदिन येणार्या कोरोनाच्या अहवालानुसार स्पष्ट होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही मार्च महिन्यात बोटावर मोजण्याइतकी होती. आणि ग्रामीण भागात देखील रुग्ण अगदी कमी होते. परंतु शहराबरोबर ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा आज 32 हजार 440 वर जाऊन पोहचला आहे. प्रतिदिन 300 हुन अधिक रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. त्यात ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत चालले आहे. गेले पंचवीस ग्रामीण भागातील कोरोनाचा अहवाल पाहिला तर ग्रामीण भागात तब्बल 2991 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
ग्रामीण भागात देखील दररोज शंभरहुन अधिक रुग्ण
शहराबरोबर ग्रामीण भागात देखील आता प्रतिदिन रुग्ण प्रचंड आढळून येत आहेत. प्रतिदिन शंभरहुन अधिक रुग्ण आढळून येत आहेत. 1 सप्टेंबर ते आज पर्यत या 25 दिवसांत ग्रामीण भागात 2991 रुग्ण वाढले आहेत. त्यामध्ये 20 दिवसांत दररोज शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये 2 सप्टेंबर ला एकाच दिवशी शंभर रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 3 ला 158, 4 तारखेला 102, 5 ला 111, 7 ला 114, 8 तारखेला 173, 9 ला 128, 10 तारखेला 164, 11 ला 145, 12 ला 121 तर 13 ला 161 रुग्णांची भर पडली. त्यानंतर 19 तारखेला 101, 22 ला 135, 23 ला 126, 24 ला 125 आणि काल 25 तारखेला ग्रामीण मध्ये एकाच दिवशी 129 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात देखील आता कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणखी काळजी घेण्याची गरज आहे.